मुंबई: राज्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आजच प्रवेश भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण असं झालं नाही. अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडणार ही चर्चा सुरु झाली. माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. नांदेडसह शेजारील जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे. चव्हाण यांनी पक्ष यांनी सोडल्याने हा काँग्रेसससाठी मोठा धक्का आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राज्यात फक्त अशोक चव्हाणच नाही, तर विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, अस्लम शेख, अमीन पटेल, हिरामण खोसकर, सुलभा खोडक, माधव जवळकर, अमित झनक हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यातच माजी आमदार हुनमंत बेटमोगरेकर आणि रमेश बागवे हे अशोक चव्हाणांसोबत असल्याची माहिती आहे. एवढ्या सर्व लोकांनी एकाचवेळी पक्ष सोडल्यास काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल. लोकसभा आणि विधानसभेला काँग्रेसची ताकत निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे.