मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना आता सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा जागांसाठीची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. अशातच आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आगामी लोकसभा निवडणुकीत 12 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांची देखील जोरदार तयारी शरद पवार यांच्याकडून करण्यात येत आहे. राज्यातील विधानसभेच्या जवळपास 58 मतदार संघातील उमेदवारांची निश्चिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागा वाटप 16-16-16 असे होते की आणखी काही फॉर्म्युला ठरतोय, हे आपल्याला लवकरच समजेल.