मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत मातोश्रीवर शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. संजय राऊत यांनी काँग्रेसला 23 जागांचं पत्र दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आपल्या जागांबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मातोश्रीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दोन तास चर्चा पार पडली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 10 ते 11 जागा लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा असल्याचीही माहिती आहे. अशातच महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर जानेवारीत काँग्रेससोबत उद्धव ठाकरे, शरद पवार गटाच्या वरिष्ठांची बैठक दिल्लीत पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा होणार आहेत.
राष्ट्रवादी ‘या’ जागांवर आग्रही?
शिरूर
सातारा
माढा
बारामती
जळगाव
रावेर
दिंडोरी
बीड
भिवंडी
अहमदनगर
अमरावती आणि भंडारा या जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू