Mumbai News : मुंबई : समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील जांबरगाव टोल नाक्याजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पोच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत आर्थिक मदत जाहीर केली आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून, जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अपघाताबद्दल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश
मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. या अपघातातील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार सुरू आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबाला ५ लाख, तर ‘पीएमएनआरएफ’मधून जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून, अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी ट्वीट करत छत्रपती संभाजीनगरच्या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. तर अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. (Mumbai News) तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगरनजीक एक खासगी वाहन ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. २० जखमींपैकी १४ जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. ६ जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.(Mumbai News) जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा वाढतोय कल; 26 टक्क्यांनी वाढली डिमॅट खाती
Mumbai News : बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे ‘एक पाऊल पुढे…