मुंबई: मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते सहरसादरम्यान २ मे रोजीपासून नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करणार आहे. अलीकडेच २५ एप्रिल रोजी २६ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन अमृतं भारत ट्रेन दाखल झाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सहरसादरम्यान साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस धावणार आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक ११०१५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २ मेपासून दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता सहरसा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ११०१६ सहरसा ४ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्जापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपूत्र, सोनपूर, हाजीपुर जंक्शन, मुज़फ्फरपुर, समस्तीपूर, हसनपूर रोड, सलौना आणि खगड़िया जंक्शन येथे थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान, या गाडीचे आरक्षण रविवार, २७एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाले आहे.