Gold Silver price : नवी दिल्ली : डिसेंबर 2023 मध्ये सोन्याने दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला होता. सोने जवळपास 66 हजारांच्या जवळपास पोहचले होते. त्यानंतर तसेच चित्र नवीन वर्षातही पहायला मिळाले. मात्र गेल्या २ दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. 4 जानेवारी रोजी भाव 440 रुपयांनी उतरले होते. आज पुन्हा काहीश्या प्रमाणात सोन्यात घसरण झाली आहे.
सोन्याचा दर
सोन्यात घसरण झाली म्हणजे ग्राहकांना सोने खरेदीची संधी चालून आली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दोन दिवसांत सोने जवळपास 700 रुपयांनी तर चांदी 2300 रुपयांनी कमी झाली आहे.
चांदीचा दर
गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे. गेल्यावर्षाच्या शेवटच्या महिन्यात चांदी जोरदार उसळली. 4 जानेवारी रोजी भाव 2000 रुपयांनी उतरले होते. तर 3 जानेवारी रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या होत्या. 2 जानेवारी 2024 रोजी चांदीचा दर 300 रुपयांनी वधारला.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.