मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे जवळपास नऊ तासांच्या ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. 24 जानेवारीलाही रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा काही कागदपत्रांसह रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.