Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘परदेशात शिक्षण शिष्यवृत्ती’साठी १७ मे पर्यंत अर्ज करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 April 2025, 17:27
Applied till 17 may for foreign education scholarship by Maharashtra Government

मुंबई: राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पी एच डी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) रँकिंग २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय/ अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाचे अटी व शर्ती इत्यादी सविस्तर माहितीसाठी विभागाच्या https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळला भेट द्यावी.

योजनेच्या अटी व शर्ती

योजनेच्या अटी व शर्ती नुसार विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएच.डी. साठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सन २०२४-२५ चे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे. विवाहित महिला उमेदवारांसाठी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखविणे आवश्यक आहे. जर अर्जदार स्वतः किंवा अर्जदाराचे आई वडील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, पती/पत्नीपासून विभक्त राहत असल्यास कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. महिला उमेदवार विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत किंवा पतीपासून विभक्त असल्यास जर वडिलांकडे वास्तव्यास असेल तर वडिलांकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखविणे आवश्यक आहे, शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल.

एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटुंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. तसेच सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही. भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी, (सन २०२५ ची QS Ranking).

या ठिकाणी अर्ज सादर करा

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज डाउनलोड करावा. हा अर्ज परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह १७ मे २०२५ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम एच बी कॉलनी, म्हाडा कमर्शिअल कॉम्प्लेक्स समता नगर, येरवडा पुणे ४११००६ येथे दोन प्रतीत सादर करावा.

योजनेच्या लाभाचे स्वरूप

परदेशातील शैक्षणिक संस्थेने अन्कंडीशनल ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी ही संबंधित यंत्रणेने थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करावी. विद्यार्थ्यांस होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यू.एस.ए. व इतर देशासाठी (यू.के. वगळून) १५०० यूएस डॉलर, आणि यू.के. साठी ११०० जीबीपी इतका निर्वाह भत्ता /इतर खर्च आकस्मिक खर्च म्हणून देण्यात येईल. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च अनुज्ञेय असेल. भारत सरकारच्या नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांस अनुसरून दरवर्षी यू.एस.ए.व इत्तर देशांसाठी (यू.के. वगळून) १५४०० यू.एस. डॉलर्स आणि यू.के. साठी ९९०० जीबीपी इतकी रक्कम किंवा विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष येणारा खर्च यापैकी कमी असणारी रक्कम अनुज्ञेय असेल, विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारतात परत येताना नजिकच्या मार्गाने (इकॉनॉमी क्लास) विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post

शिवसेना खासदाराच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याने वादाची ठिणगी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.