Anand Mahindra : मुंबई : माणसाने नदीच्या किनाऱ्यावर शहराची निर्मीती केली. आज पाहील तर अनेक मोठी शहरे नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेली पहायला मिळतात. तिथल्या रहिवाश्यांमुळे नद्या अक्षरश: विषारी बनवल्या आहेत. पुढे जाऊन त्या सनुद्राला मिळतात. मात्र, समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांनीही कचरा समुद्रात टाकून समुद्रही खराब केले आहेत. त्याचच एक ताज उदाहरण म्हणजे व्हायरस होत असलेला एक व्हिडीओ. ज्यावर उद्योगपती आनंद महिंद्रायांनीही संतापज व्यक्त केला आहे.
It hurts just to see this. No amount of improvement in physical infrastructure can improve the city’s quality of life if the civic attitude isn’t transformed. @IqbalSinghChah2 @MumbaiPolice https://t.co/Efh0ssHQ3f
— anand mahindra (@anandmahindra) November 21, 2023
व्हिडीओतली दुश्य
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकांचा एक गट मोठ्या पिशव्यांमधून फुले समुद्रात टाकताना दिसत आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ हे दृश्य रेकॉर्ड करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मुंबईचे चांगले नागरिक. गेटवे ऑफ इंडिया येथे पहाटे.”
आनंद महिंद्राची पोस्ट
शहरे असोत वा रेल्वे स्टेशन्स, स्वच्छतेच्या बाबतीत लोक कितीही सांगितलं तरी एकत नाहीत. ‘मी कचरा करणार नाही आणि दुसऱ्याला करु देणार नाही’ हा संकल्प आपण स्वतः अंमलात आणत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रशासनाला दोष देण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट मत बहुतांश प्रतिक्रियांमधून व्यक्त झालं. स्वच्छतेच्या दुश्मनांवर कडक दंडात्मक कारवाई हाच रामबाण इलाज असल्याचंही अनेकांना वाटतंय. असाच एक गेट ऑफ इंडियाजवळचा व्हायरल व्हिडीओ पाहून “हे पाहून त्रास होतो,” म्हणत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप व्यक्त कराल.
त्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यांना अटक का करत नाहीत? असे एकाने म्हटले आहे. तर कचरा टाकणाऱ्यांना आयडेंटीफाय करून त्यांची चौकशी करा, असे दुसऱ्याने म्हटले आहे. आनंद महिंद्राची पोस्ट व्हायरल होताच, अनेकांनी उद्योगपतींच्या विचारांचा पुनरुच्चार केला. “निश्चितपणे, शहराचा आत्मा केवळ त्याच्या रचनेत नसून तेथील लोकांच्या मानसिकतेत असतो. लोकांची वृत्ती, जबाबदारीमध्ये बदल झाला तर शहराच्या जीवनाचा दर्जा खरोखरच उंचावू शकतो. त्यामुळे सकारात्मक बदलाची आशा आहे,” अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.