मुंबई: दिशा सॅलियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी न्यायालयाने आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत राशिद खान पठाण यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी अशी मागणी करत एक कॅव्हेट दाखल केलं
आहे.
काय आहे याचिका?
8 जून 2020 रोजीच दिशा सॅलियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर या सर्वांचे मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सर्वजण 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं, अशी मागणी या याचिकेत केली आहे.
हेही वाचा:
ICC ODI Rankings: रोहित शर्माने आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप, शुभमन, विराट टॉप टेनमध्ये कायम
कामाची गोष्ट: तुम्हाला सर्व ई-मेल आपोआप फॉरवर्ड करायचेत, मग अशी करा जीमेलमध्ये सेटिंग
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी केली वाढ