मुंबई : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची सोमवारी घटना घडली होती. या दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा फोनही बंद आहे. जे होर्डिंग कोसळलं ते बेकायदेशीर असल्याचं समोर आलं आहे. आरोपी भावेश भिंडे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता.
मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर 13 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेल्या 88 जण जखमी झाले आहेत. 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या प्रकरणात भावेश भिंडे आरोपी असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध सुरु असून तो सध्या फरार असल्याचं समोर आलं आहे. भावेश भिंडे कुटुंबासह फरार झाला आहे.
इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हे याच कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे भावेश भिंडे?
इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हा इगो मीडियाचा संचालक आहे. याच मीडिया कंपनीचं हे होर्डिंग होतं. त्यामुळे भिंडे याच्यासह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2009 मध्ये भावेश भिंडेने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावर 26 गुन्हे दाखल असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.