मालाड (मुंबई) : मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅंड रनची घटना घडली आहे. भरधाव गाडीच्या धक्क्याने पुन्हा एक भीषण अपघात मुंबई मध्ये झाला आहे. 27 वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
शहाना काझी असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव अनुज सिंह असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहाना काझी या मेहंदीचा क्लास घेऊन आपल्या घराकडे जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या फोर्ड कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर महिला काही अंतर कारसोबत फरफटत गेली आणि तिचा मृत्यू झाला.
#WATCH | A 27-year-old woman died after being hit by a speeding car in the Malad area of Mumbai last night. The accused driver took the injured woman to the hospital, where the doctors declared her dead. Malad Police have registered a case against the accused and arrested him.… pic.twitter.com/RZCOjTCwVO
— ANI (@ANI) September 4, 2024
दरम्यान, मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 281,285,105 आणि 184,185 कलम अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.