मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलचं वेळापत्रक आता कोलमडणार आहे. कारण पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विस्कळीत वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे.
गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 4.5 किलो मीटर लांबीची सहाव्या मार्गीकेचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी हा मेगाब्लॉक असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. या मेगाब्लॉकचा लोकल सेवेवर परिणाम होणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द ही करण्यात आल्या आहेत. दरम्यान गणेशोत्सव तोंडावर असताना हा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. असे असले तरी 10 दिवसांच्या गणेशोत्सव उत्सवादरम्यान हे काम थांबवले जाईल असे अधिका-यांनी आश्वासन एका वृत्ताने दिली आहे.
ब्लॉकदरम्यान गणेशोत्सव असल्याने 11 ते 17 सप्टेंबर या कालावधीत मार्गिकेचे काम करण्यात येणार नाही, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ब्लॉकमध्ये केवळ 130-140 गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मेगाब्लॉकचा कालावधी सुरू झाल्यानंतर पाचव्या, 12 व्या, 19 व्या, 26 व्या आणि 33 व्या दिवशी हे ब्लॉक घेतले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाचे दिली.
Project Name: Commissioning of 6th Line Between Goregaon and Kandivali Stations
Length: Approx. 4.5 km
Duration: 42 days (35 working days)
Start Date: Night of August 27/28, 2024Project Overview:
· The 6th line will be laid east of the existing tracks from Goregaon to Malad (S)… pic.twitter.com/CQ2sGX9d2t— DRM – Mumbai Central, WR (@drmbct) August 26, 2024
सध्या दहीहंडी, गणेशोत्सव यामुळे लोकलला मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता या ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. असे असले तरी गणेशोत्सवात रेल्वेने विशेष निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवातील 7 ते 17 सप्टेबर दरम्यान नव्या मार्गिकेचे कोणतेही काम केले जाणार नाही. त्यावेळी लोकल सेवा नियमित आणि नियोजित वेळापत्रका प्रमाणे चालेल असेही पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले की, मेगा ब्लॉक प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी होईल. 10 तासांचे ब्लॉक्स रात्रीच्या वेळी पाच वेगवेगळ्या वेळेला असतील. या ब्लॉक्स दरम्यान प्रत्येक रात्री सुमारे 130-140 ट्रेन सेवा रद्द होण्याची अपेक्षा आहे. आठवड्याच्या दिवशी, ब्लॉक्स लहान असतील, ते रात्री पाच तासांपर्यंत चालतील, परिणामी कमी गाड्या रद्द होतील.