Mumbai Crime News : मुंबईमधून एक डोकं चक्रावून टाकणारी घटना समोर येत आहे.. प्रेयसीने शॉपिंगसाठी 1 लाख रुपये मागितले म्हणून बॉयफ्रेंडने टोकाचं पाऊल उचललंत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या पवई परिसरात ही घटना घडली आहे. प्रथम असं 20 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
प्रथम हा पवई पोलीस स्टेशन हद्दीत राहत होता. आपल्या मुलाने अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं या विचाराने त्याचे आई वडील त्रस्त होते. मुलाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशात मुलाच्या मित्राने आता त्याच्या आत्महत्येमागच कारण सांगितलं आहे. प्रथमच्या मित्राने त्याच्या वडिलांची भेट घेतली.
तसेच प्रथमच्या गर्लफ्रेंडबाबत सांगितले. तरुणी प्रथमला सतत त्रास देत होती. तिने त्याच्याकडे शॉपिंगसाठी एक लाख रुपये मागितले होते. एव्हढी मोठी रक्कम कुठून आणायची यामुळे तो चिंतेत होता. पैसे न दिल्याने ती त्याला सतत त्रास द्यायची. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावं, असं मित्राने सांगितलं.
वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात प्रथमचा फोन तपासला. त्यावेळी यात त्या दोघांची चॅट पोलिसांना सापडली. त्यामुळे मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.