वाढतं वजन हे चिंतेचं कारण बनू शकतं. त्यामुळे अनेक लोक वजन कमी करणाऱ्याला प्राधान्य देतात. त्यात धावणे हे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते. परंतु, गुडघेदुखी, सांधेदुखी, वेळेचा अभाव अशा कारणांमुळे अनेकजण धावणे टाळतात. अशा परिस्थितीत काही व्यायाम प्रकार केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
‘इनलाइन ट्रेडमिल वर्कआउट’ हे एकदा करून पाहा. या वर्कआउटमध्ये, ट्रेडमिल हळूहळू झुकली जाते, ज्यामुळे शरीराला अधिक मेहनत करावी लागते. त्याचा फायदा विविध प्रकारे होतो. त्यात कॅलरीज् जलद गतीने बर्न होतात. सामान्य चालण्याच्या तुलनेत 30-40 टक्के जास्त कॅलरी बर्न होतात. स्नायू अधिक सक्रिय होतात. विशेषतः ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग आणि पाय यांचे स्नायू हे सक्रीय दिसून येतात. हृदयक्रियाही मजबूत राहते. यामुळे तग धरण्याची क्षमता वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
यात 1-5 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक व्यायामापूर्वी वॉर्म-अप खूप महत्वाचे आहे, जेणेकरून शरीर व्यायामासाठी तयार होऊ शकेल. 5° उतारावर संथ गतीने चालणे तुमचे पाय, गुडघे आणि पाठीचे स्नायू वॉर्म होण्यास मदत करते. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि दुखापत होण्याची शक्यता कमी होते.