Xiaomi smart electric bed : नवी दिल्ली : स्मार्ट इलेक्ट्रिक बेडचे नाव कदाचित काहींसाठी नवीन असेल. पण हा स्मार्ट इलेक्ट्रिक बेड त्याच्या नावाप्रमाणेच स्मार्टही आहे. आपल्या फ्रेमलेस डिझाइनमुळे हा बेड विशेष वाटतो जो मोठ्या आणि जास्त बेडच्या, छुप्या बेडच्या लेयरसह स्लीक आणि डेलीकेट लूक देतो. या बेडमध्ये ‘इंटेलिजेंट वार्म लायटिंग सिस्टम’ देण्यात आली असून, ज्याचा वापर रात्री अँबिएंट लाइटिंग म्हणून करता येतो.
स्मार्ट इलेक्ट्रिक बेड चांगल्या फीचर आणि कंफर्टसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो 8 वेगवेगळे कंफर्ट मोड देतो. ज्यात अँटी स्नोरिंग, टीव्ही, झिरो ग्रॅव्हिटी, नर्सिंग, रीडिंग, गेमिंग, योग आणि फ्लॅट मोडचा समावेश आहे. जे अनेक गरजा पूर्ण करतात. हा बेड पाठीसाठी 60 डिग्री आणि पायांसाठी 40 डिग्री रेंजमध्ये अॅडजस्टमेंट आणि कंफर्ट देऊ शकतो.
शाओमी बेड फ्रेम स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह येतो. यामध्ये एमआय होम अॅप, झिओ एआय व्हॉइस कंट्रोल आणि एक रिमोट कंट्रोलचा समावेश आहे. यामुळे बेड पॉजिशन सहज ऍडजस्ट करता येतात. या ऍपच्या माध्यमातून उठल्यावर पाठीचा भाग वर उचलता येईल. शाओमीने या बेडसाठी मॅट्रेसचे तीन ऑप्शन आणले आहेत, ज्यात 20 सेमी जाड फुल-सपोर्ट स्प्रिंग लेटेक्स स्लीपिंग मॅट्रेस, एक 25 सेमी जाड MZ1 झिरो-डिग्री कॉटन मॅट्रेस आणि एक 15 सेमी जाड स्कॉट नॅचरल प्युअर लेटेक्स मॅट्रेसचा समावेश आहे.
यात तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मॅट्रेसचे कॉम्बिनेशन विकत घेऊ शकता. त्यानुसार, किंमत देखील बदलू शकते. निवडक साईज आणि मॅट्रेसच्या साईजच्या आधारावर ही किंमत सुमारे 33,372 रुपये ते 71,525 रुपयांपर्यंत जाऊ शकते.