सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. परिणामी, काही गंभीर आजार बळावू शकतात. असे असताना विवाहित आणि अविवाहित लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यातून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून हे समोर आले की, विवाहित लोकांमध्ये तणाव आणि नैराश्याचे प्रमाण कमी असते, तर अविवाहित लोकांना या मानसिक समस्यांचा धोका जास्त असतो. अभ्यासानुसार, अविवाहित लोकांमध्ये एकटेपणाची भावना जास्त असते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्याची शक्यता वाढते. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून मिळणारा पाठिंबा आणि साहचर्य माणसाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते.
वैवाहिक जीवनात, दोन लोक त्यांच्या समस्या सामायिक करतात आणि एकमेकांचा आधार बनतात, ज्यामुळे मानसिक समस्यांचा धोका कमी होतो. विवाहाचे बंधन केवळ दोन व्यक्तींचा भावनिक आधार देखील आहे. अविवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेकदा एकटेपणा जाणवतो, जे कालांतराने मानसिक समस्यांमध्ये बदलू शकते. वैवाहिक जीवनात कुटुंब आणि मुलांचा सहवासही माणसाचे मानसिक आरोग्य सुधारतो. असा देखील निष्कर्ष समोर आला आहे.