पुणे प्राईम न्यूज डेस्क : वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. वाढत्या वजनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आदी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रीत असणे आवश्यक असते. परंतु वजन नेमके कसे नियंत्रित करावे, यासाठी किती कालावधी द्यावा असे अनेक प्रश्न आपल्यापुढे निर्माण होत असतात.
चला तर मग वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं ते जाणून घेऊयात…
– वजन कमी करायचं असेल तर गोड पदार्थ खाणे टाळा. ज्यामुळे तुमचे वजन वाढते. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर गोड पदार्थ सेवन करु नका.
– लठ्ठपणा कमी करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे जीवनसत्त्वे. काजू, फळे आणि पालेभाज्या खा. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी लिंबू, पेरू, संत्री, पपई या व्हिटॅमिन सीचे सेवन करणे फायदेशीर आहे कारण ते चरबी कमी करण्यास मदत करते.
– वजन कमी करण्यासाठी रोज प्रथिने युक्त आहार घ्या.
– रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने लठ्ठपणा कमी करण्याचे उद्दिष्ट पटकन गाठता येते. तसेच रात्रीच्या जेवणानंतर चेरी खा. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
– वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर फायदेशीर ठरत असतो. हे सकाळी नाश्त्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी खाऊ शकता.
– वजन कमी करण्यासाठी मधाचे सेवन करा कारण त्यात असलेले आवश्यक हार्मोन्स भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.
– जास्त पाणी प्यायल्याने भूकही नियंत्रणात राहते आणि वजनही वाढत नाही.
– बाजारातील म्हणजेच बाहेरचे अन्न जास्त खाऊ नका. कारण एका दिवसाचे बाहेरचे अन्न तुमचे संपूर्ण टार्गेट खराब करू शकते.