Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या, परिसर स्वच्छ ठेवा”, – डॉ. नामदेव पानगे यांचा सल्ला

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 16 June 2024, 18:24

शिरुर : शिरुर तालुक्याच्या बेट भागात मृग नक्षत्रातील पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसाने व बदललेल्या हवामानाने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

आपल्या घरामध्ये पाणी साठवण्यासाठी असणारे बॅरल, हौद, रांजण, सिंटेक्स टाक्या, ज्यात आपण पाणी साठवून ठेवतो. पाणी पिण्याचे असो किंवा वापरायचे असो आठवड्यातून किमान एकदा सदर भांडी म्हणजे कंटेनर घासून त्यानंतर ते कोरडे करून धुवावेत. जेणेकरून डासांच्या मादीने घातलेली अंडी नष्ट होतात. हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये डासांची निर्मिती होणार नाही.

त्याचबरोबर घराच्या अवतीभोवतीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करावा. तसेच घराच्या टेरेसवर आपण ठेवलेल्या टाकाऊ वस्तू उदाहरणार्थ कलरचे रिकामे डबे, टायर, मडके, पक्षी यांना पिण्यासाठी ठेवलेले भांडे, गाडगे, भंगार साहित्य या वस्तूंमध्ये सुद्धा पाणी साठवून डेंग्यूच्या डासांची निर्मिती होते. म्हणून आपण या वस्तू पालथ्या घालाव्यात किंवा अडोशाच्या ठिकाणी पुन्हा पाणी साठले जाणार नाही अशा ठिकाणी ठेवाव्यात.

डेंग्यूची लक्षणे –
तीव्र ताप, थंडी, डोकेदुखी, अंगावर लालसर चट्टे किंवा पुरळ तसेच चिकनगुनिया मध्ये वरील लक्षणे दिसून येऊन सोबत संपूर्ण शरीराच्या सांध्या मध्ये तीव्र वेदना होणे. पेशंट वाकून चालतो आणि दम लागतो. कृपया सदर लक्षणे आढळल्यास आपल्या शासकीय यंत्रणेच्या दवाखान्यामध्ये रक्ताची तपासणी करून निदान करावे. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे, आराम करणे, किवी, ड्रॅगन फळ यासारखी फळ खावीत. आपल्या कार्यक्षेत्रातील असणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना कळवून माहिती द्यावी.

 

डेंग्यू व चिकुनगुनिया हे दोन्ही आजार एकाच डासाच्या मादीमुळे म्हणजे एडीस या डासामुळे हे आजार होतात. या डासाच्या अंगावर पांढरे पांढरे ठिपके असतात, म्हणून त्याला टायगर मॉस्किटो असे संबोधले जाते. हा डास दिवसा चावणारा असून त्याच्या गुणगुण करण्याचा आवाज बिलकुल येत नाही, म्हणून त्याला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात. या आजारामध्ये पेशंटला लक्षणानुसार उपचार दिला जातो.

आपल्या गावातील उकिरडे जे पावसाळ्यात दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी साठून राहते त्याच बरोबर आपल्या घराभोवताली तुंबलेली गटारे त्याचबरोबर प्रत्येकाकडे असणा-या या शौचालयाच्या खालील टाकीमध्ये व्हेंटलेशन पाईप द्वारे डासाची मादी अंडी घालण्यासाठी खालील टाकीमध्ये उतरते. हजारो प्रमाणामध्ये या ठिकाणी डासांची वाढ होत असते. म्हणून आपण शौचालयाच्या व्हेंट पाईपला वरील बाजूने रुमाला सारख्या सुती कापड बांधावे, जेणेकरून शौचालयाच्या टाकीमधील तयार झालेले डास बाहेर येणार नाहीत. आणि नव्याने अंडी घालण्यासाठी हे डास आत जाणार नाही. दर सहा महिन्यातून एकदा हे कापड बदलावे.

कृपया वरील सर्व सांगितलेल्या गोष्टी व त्यासाठी कारावयाच्या च्या उपयोजना लक्षात घेऊन कराव्यात ही विनंती आणि इतरांना ही माहिती पाठवून जागृत करावे.

– डॉ. नामदेव पानगे- वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळी हाजी- ता.शिरुर, जि.पुणे.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

उरुळी कांचन येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा 'उत्स्फूर्त' प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp