Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांना शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी यंदाचा प्रतिष्ठित ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ठाणे येथील मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून या विशेष सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (27 सप्टेंबर) सकाळी 11 ते दुपारी 1:30 या वेळेत ठाण्यातील प्रसिद्ध ‘गडकरी रंगायतन’ तलावपाळी येथे पार पडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. कराड यांना हा गौरव दिला जाईल. या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ‘मराठवाडा मित्र’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून खासदार नरेश म्हस्के व आमदार संजय केळकर यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.

गेल्या 35 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षण क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या डॉ. मंगेश कराड यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून नवसंशोधन, कौशल्य विकास आणि आधुनिक शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या याच दूरदृष्टीची आणि शैक्षणिक सेवेची दखल घेऊन परिषदेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

मराठवाडा जनविकास परिषद ही संस्था मागील 17 वर्षांपासून मराठवाड्यातील लोकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी ‘मराठवाडा बहुभाषिक दिन’ साजरा केला जातो. याच उपक्रमाचा भाग म्हणून दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53
Next Post

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!'त्या 'महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp