डॉ. अशोक बालगुडे

हडपसर : गाडीतळ उड्डाणपुलाच्या बेरिंग बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लावण्यात आलेले जॅक काढण्यासाठी रविवारी (27 सप्टेंबर) मध्यरात्री 1 ते 3 या वेळेत गाडीतळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याकडून सोलापूर आणि सासवडकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होणार असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन हडपसर वाहतूक विभागाने केले आहे.

या कालावधीत उड्डाणपुलावरून न जाता पुलाखालून सासवड व सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे. वाहतूक परिस्थितीनुसार मार्गात आवश्यक बदल करण्यात येऊ शकतात.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






