फिरायला जाणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सलग सुट्टी आली की लगेच फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो. पण, तुम्ही भारताबाहेर अर्थात परदेशात जाण्याचा प्लॅन करणार असाल तर भारतात अशी काही ठिकाणं आहेत त्यांना ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते.
औली हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे. भारताच्या उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हे ठिकाण आहे. स्कीइंगसाठी औली ही पर्यटकांची पहिली पसंती आहे. हिवाळ्याच्या मोसमात हे ठिकाण बर्फाने झाकले जाते आणि येथून स्वित्झर्लंडसारखाच फिल येतो. हिमाचल प्रदेशातील खज्जियार या ठिकाणाला देखील भारताचे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हटले जाते. जर तुम्हाला शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य एकत्र पाहायचे असेल तर खज्जियारपेक्षा चांगले ठिकाण सापडणार नाही. हे ठिकाण देखील बेस्ट रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे.
कौसानी हे उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आणि लहान गाव आहे. विकेंडला जाणाऱ्यांसाठी हे विशेष असे ठिकाण होऊ शकतं. कौसानीमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी अनाशक्ती आश्रम, कौसानी टी इस्टेट, सुमित्रानंदन पंत संग्रहालय, बैजनाथ मंदिर आणि रुद्राधारी फॉल्स आणि लेणी विशेष अशा आहेत.