सध्या योगासनांना एक विशेष महत्त्व असं महत्त्व दिलं जातं. त्यात ही योगासनं आपल्या आरोग्यासाठी फायद्याचीच असतात. त्यामुळे वेळ काढून हे केल्यास तुमच्या आरोग्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. ज्ञानमुद्रा ही एक विशिष्ट अशी मुद्रा असून, याच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडू शकते.
ज्ञानमुद्रा आपल्या तंद्रीला तोडत असल्याने ती श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. हातातील नसाचा संबंध सरळ मेंदूशी असतो. डाव्या हाताचा संबंध उजव्या मेंदूशी तर उजव्या हाताचा संबंध डाव्या मेंदूशी आहे. ज्ञानमुद्रा मानवाच्या झोपलेल्या शक्तींना जागृत करण्याचे काम करते. ज्ञानाचा अर्थ खूप माहिती किंवा वैचारिकता नाही. ही ज्ञानमुद्रा करताना अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट एकमेकांना स्पर्श करेल, अशा अवस्थेत ठेवून इतर तीन बोटांना सरळ ठेवावे. सिद्धासन, उभे राहून किंवा झोपेतही जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे या मुद्राचे प्रयोग करावा.
निद्रानाश, हिस्टेरिया, राग आणि निराशेला ही मुद्रा दूर करते. त्याच्या नियमित अभ्यासाने मानसिक आजारांपासूनही मुक्ती मिळते. या ज्ञानमुद्रेमुळे ज्ञान वाढते. अंगठ्याच्या दोन्ही बाजूंच्या ग्रंथी सक्रिय राहतात. यामुळे मेंदूची स्मृती वाढते. त्यामुळे हे करण्याला प्राधान्य द्यावे.