Lifestyle : पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत असतोच. त्यात चेहऱ्याकडेही लक्ष देणारे अनेकजण आहेत. पण या पावसाळ्यात चेहरा तेलकट होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ही ऑईली स्कीन तुम्हाला नको असेल किंवा हा ऑईलीनेस कमी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
दही आणि कॉफी यावर गुणकारी ठरू शकते. त्यासाठी एका भांड्यात एक चमचा दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर घाला. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. हे मिश्रण डोळ्याभोवती लावू नका. 15 मिनिटांनंतर हलक्या हाताने मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा चमकदार दिसेल. तसेच नारळाचे तेल आणि कॉफीदेखील उपयुक्त ठरू शकते. एका भांड्यात अर्धा चमचा खोबरेल तेल घ्या आणि त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर घाला. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि वर्तुळाकार गतीने मसाज करा. 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल.
याशिवाय, चेहऱ्यावर काळे डाग वाढले असतील, तर एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे ठेवा. यानंतर हलक्या हातांनी मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, असे केल्याने तुम्हाला चेहऱ्यामध्ये फरक दिसून येऊ शकतो.