पुणे : आजच्या जीवनशैलीत केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. ज्यामुळे पुरूषांपासून महिलांपर्यंत स्त्रिया अस्वस्थ होतात. पण जेव्हा केसांची झपाट्याने गळती होऊ लागते तेव्हा चिंता वाढू लागते. विशेषतः केसगळती ही बऱ्याचदा अनुवंशिक, अनियमित खाणे, जास्त तणाव आणि मद्यपानाचे अतिरिक्त सेवन यामुळे होते. यासाठी केसांची योग्य काळजी राखणं गरजेचं आहे.
चला तर मग केस गळतीवरील काही घरगुती उपायाबद्दल जाणून घेऊयात…
खोबरेल तेल
– आंघोळीनंतर सर्वप्रथम केस हवेत वाळवावेत. यानंतर त्यांना कोणत्याही तेलाने मसाज करा. केसांसाठी नारळाचं तेल उत्तम मानलं जातं. यामुळे केस गळण्यापासून बचाव होतो आणि त्यांच्यात चमक निर्माण होते.
तांदळाचे पाणी
– तांदूळ धुतल्यावर तांदळाचे पाणी आपण टाकून देतो. ते पाणी फेकण्याऐवजी त्याने हळूहळू केस धुवा. असे केल्याने केसगळती कमी होईल.
कडुनिंब
– कडुनिंब केसगळती रोखण्याचे काम करते. याचा वापर करण्यासाठी आपल्या डोक्यातील केसगळती कमी करण्यासाठी कडुनिंबाची पावडर एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घालावे. यानंतर दोन्ही मिसळून द्रावण तयार करा आणि नंतर डोक्याच्या टाळूवर सोडा. साधारण 40 मिनिटांनी थोडेसे शॅम्पू लावून केस स्वच्छ करावेत.
कांद्याचा रस
– केसांना कांद्याचा रस लावला करी केसांच्या वाढीस मदत होते आणि पर्यायाने केस गळती कमी होण्यास मदत होते.
कोरफडीचा गर
– कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात.
कढीपत्ता
– अँटिऑक्सिडंटने भरलेले, कढीपत्ता केस गळती रोखण्यास मदत करू शकते. ताज्या कढीपत्त्याचा रस तयार करा आणि आपल्या टाळूला लावा.