Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादा राज्यसभेवर कुणाची लावणार वर्णी? : बायको, मुलगा की छगन भुजबळ?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 12 June 2024, 14:49

पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आता राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरु आहे. महायुतीने राज्यसभेची एक जागा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला दिली आहे. उद्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, राष्ट्रवादीने अजूनही राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे अजित पवार राज्यसभेवर नेमकं कुणाला पाठविणार अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. हा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार असल्याची माहिती आहे.

भाजपने अजित पवार गटाला राज्यसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अजितदादा यांच्या गटाचं संसदेतील एकूण संख्याबळ तीन होणार आहेत. सुनील तटकरे हे लोकसभेत तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेत आहेत. त्यात आता आणखी एका खासदाराची भर पडणार आहे. परंतु राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबद्दल खलबतं सुरु आहेत. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देऊन त्यांचं पुनर्वसन करावं असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर पार्थ पवार यांना संधी द्यावी असं पक्षातील एका गटाचं म्हणणं आहे. तर एक गट मात्र छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवा आणि पक्षाचा आवाज बुलंद करावा असं म्हणत आहे. त्यामुळे आता अजित पवार बायको, मुलगा की छगन भुजबळ? यापैकी कुणाला राज्यसभेची संधी देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता असल्याची वर्तविली जात आहे. राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आजच उमेदवाराच्या नावाची घोषणा करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीमध्ये राज्यसभेच्या नावाच्या स्पर्धेत पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ आहेत. या तिघांपैकी एकाला राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता अजितदादा या तिघांपैकी नेमकी कुणाला उमेदवारी देतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या स्पर्धेत सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

काटेवाडीतील गावकरी एकवटले

सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामतीच्या काठेवाडी गावातील ग्रामस्थ आणि सरपंच एकत्र आले होते. त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्री करावं, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली होती. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळेल. कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल. असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

सुनेत्रा पवारांसाठी आमदार सरसावले

दरम्यान, राज्यसभेवर संधी मिळण्याच्या स्पर्धेत सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे. राज्यभरातील आमदारांनी अजित पवार यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांनाच राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत एक महत्त्वाचा ठराव करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध ‘मोरपंख सारीज’ व्यवसायात 1 कोटी 59 लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 14:22

पुणे पोलिस दलातील अंमलदाराला 12 किलो गांजासह अटक! वैद्यकीय रजेवर असताना तेलंगणात रेल्वेतून कथित तस्करी

Tuesday, 27 October 2026, 14:19

मुंढेंच्या कारवाईला स्थगिती! राजकीय हस्तक्षेपाचा आरोप; मिथेनॉल कंपन्यांच्या परवान्यांवरून वाद; झिरवाळ यांनी दबाव नाकारला

Tuesday, 27 October 2026, 14:14

अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; एमडी विक्रीप्रकरणी कारवाई सुरू असताना घटना

Tuesday, 27 October 2026, 14:12

मॉलमध्ये संशयास्पद वायू; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

Tuesday, 27 October 2026, 13:24

पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? 3 नोव्हेंबरला मेट्रो होण्याची शक्यता

Tuesday, 27 October 2026, 13:12
Next Post

तुमचेही केस खूप गळतात का ? काही घरगुती उपायाबद्दल जाणून घेऊयात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp