Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिस दलातील अंमलदाराला 12 किलो गांजासह अटक! वैद्यकीय रजेवर असताना तेलंगणात रेल्वेतून कथित तस्करी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 27 October 2026, 14:19

पुणे, ता. 27 : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पुणे शहर पोलिस दलातील एका अंमलदारालाच अमली पदार्थांच्या कथित तस्करीप्रकरणी अटक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तेलंगणा राज्यात रेल्वेतून 12 किलो गांजा घेऊन जात असल्याच्या आरोपावरून तेथील पोलिसांनी संबंधित अंमलदाराला पकडले. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

नितीन ज्ञानू शिंदे (वय 33, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या अंमलदाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तेलंगणा राज्यातील नेकुंडा पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन शिंदे हा पुणे शहर पोलिस दलात कार्यरत असून, त्याची नेमणूक विश्रामबाग वाहतूक विभागात होती. तो 8 ऑक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर होता. याच कालावधीत रेल्वेतून 12 किलो गांजा घेऊन जात असल्याच्या संशयावरून तेलंगणा पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. या कारवाईची माहिती तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे नाव अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी समोर आल्याने विभागात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, शिंदे हा गांजा नेमका कुठे घेऊन जात होता, त्याला हा अमली पदार्थ कोणी दिला आणि या कथित तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“साहेब माझ्या वडिलांना न्याय द्या” ढसाढसा रडतांनाच पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी गाडीत रिक्षात कोंबलं; आंदोलनाअगोदरच राम पूर्णेकर ताब्यात

Tuesday, 27 October 2026, 14:57

‘आवडली का?’ तरुणींचे फोटो पाठवून ऑनलाईन सौदा! ग्राहकांच्या मागणीनुसार मुली पुरवायचा; पोलिसांनी सापळा रचत हॉटेलवर धाड टाकली अन्..

Tuesday, 27 October 2026, 14:54

पुरंदरमधील दुहेरी हत्याकांडाचा छडा! संशयित ताब्यात, टीप मिळताच पोलिसांचा 50 किमी पाठलाग; सशस्त्र नाकाबंदी करत घेराव घातला अन्…

Tuesday, 27 October 2026, 14:49

विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड चालणार नाही! वयाच्या पुराव्याबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; आता कोणती कागदपत्रे ग्राह्य धरणार?

Tuesday, 27 October 2026, 14:47

पुण्यातील प्रसिद्ध ‘मोरपंख सारीज’ व्यवसायात 1 कोटी 59 लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 14:22

पुणे पोलिस दलातील अंमलदाराला 12 किलो गांजासह अटक! वैद्यकीय रजेवर असताना तेलंगणात रेल्वेतून कथित तस्करी

Tuesday, 27 October 2026, 14:19
Next Post

पुण्यातील प्रसिद्ध ‘मोरपंख सारीज’ व्यवसायात 1 कोटी 59 लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp