Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड चालणार नाही! वयाच्या पुराव्याबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; आता कोणती कागदपत्रे ग्राह्य धरणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 October 2026, 14:47

पुणे : बालविवाहांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने विवाह नोंदणीबाबत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आता नवविवाहित जोडप्यांची नोंदणी करताना केवळ आधार कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) वयाचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दीपक पाल यांच्या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती तेज प्रताप तिवारी यांनी हा आदेश दिला असून न्यायालयाने यासंदर्भात 9 कडक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विवाह नोंदणी विभागाचे एआयजी अमिताभ कुमार यांनी कबुली दिली की, संबंधित विवाहाची नोंद केवळ आधार आणि टीसीच्या आधारावरच केली गेली असून जन्मतारखेची योग्य पडताळणी करण्यात आली नव्हती. या चुकीबद्दल अधिकाऱ्याने न्यायालयात माफी मागितली असून यापुढे नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, आधार कार्ड हे केवळ ओळख पटवण्यासाठी असते आणि ते जन्मतारखेचा कायदेशीर पुरावा ठरू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वकालीन निर्णय आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत न्यायालयाने वयाच्या अचूक पडताळणीवर भर दिला आहे.

कायदेशीर नियमांनुसार वयाची खात्री करण्यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळेचा अधिकृत जन्मदाखला, नगरपंचायतीचा जन्म दाखला किंवा विशेष प्रसंगी हॉस्पिटलचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाऊ शकते. स्वतंत्र कागदपत्र म्हणून टीसी स्वीकारण्यावर काही कायदेशीर मर्यादा असल्याचे न्यायालयाने सांगितले.

विवाह नोंदणी ही केवळ कागदी प्रक्रिया नसून बालविवाह रोखण्याचे ते एक प्रभावी माध्यम असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे.कायद्यानुसार लग्नासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरमधील दुहेरी हत्याकांडाचा छडा! संशयित ताब्यात, टीप मिळताच पोलिसांचा 50 किमी पाठलाग; सशस्त्र नाकाबंदी करत घेराव घातला अन्…

Tuesday, 27 October 2026, 14:49

विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड चालणार नाही! वयाच्या पुराव्याबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; आता कोणती कागदपत्रे ग्राह्य धरणार?

Tuesday, 27 October 2026, 14:47

पुण्यातील प्रसिद्ध ‘मोरपंख सारीज’ व्यवसायात 1 कोटी 59 लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 14:22

पुणे पोलिस दलातील अंमलदाराला 12 किलो गांजासह अटक! वैद्यकीय रजेवर असताना तेलंगणात रेल्वेतून कथित तस्करी

Tuesday, 27 October 2026, 14:19

मुंढेंच्या कारवाईला स्थगिती! राजकीय हस्तक्षेपाचा आरोप; मिथेनॉल कंपन्यांच्या परवान्यांवरून वाद; झिरवाळ यांनी दबाव नाकारला

Tuesday, 27 October 2026, 14:14

अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; एमडी विक्रीप्रकरणी कारवाई सुरू असताना घटना

Tuesday, 27 October 2026, 14:12
Next Post

पुरंदरमधील दुहेरी हत्याकांडाचा छडा! संशयित ताब्यात, टीप मिळताच पोलिसांचा 50 किमी पाठलाग; सशस्त्र नाकाबंदी करत घेराव घातला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp