Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; एमडी विक्रीप्रकरणी कारवाई सुरू असताना घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 27 October 2026, 14:12

पिंपरी-चिंचवड : अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीचा पाठलाग करताना पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. रविवारी (ता. 25) रात्री उशिरा संत तुकारामनगर परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईदरम्यान ही घटना घडली.

जावेद बागसिराज (वय -40) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना संत तुकारामनगर परिसरात दोन जण एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जावेद यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. मात्र, त्याचा दुसरा साथीदार पळून जाऊ लागल्याने जावेद यांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

पाठलाग करत असतानाच जावेद यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते जमिनीवर कोसळले. सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जावेद बागसिराज हे 2010 मध्ये पुणे शहर पोलिस दलात भरती झाले होते. सुरुवातीची आठ वर्षे त्यांनी हडपसर आणि मुंढवा पोलिस ठाण्यांत सेवा बजावली. 2018 मध्ये पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर ते या पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पिंपरी पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेत काम केले. सध्या ते अमली पदार्थविरोधी पथकात कर्तव्य बजावत होते.

दरम्यान, जावेद यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, 12 वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“साहेब माझ्या वडिलांना न्याय द्या” ढसाढसा रडतांनाच पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी गाडीत रिक्षात कोंबलं; आंदोलनाअगोदरच राम पूर्णेकर ताब्यात

Tuesday, 27 October 2026, 14:57

‘आवडली का?’ तरुणींचे फोटो पाठवून ऑनलाईन सौदा! ग्राहकांच्या मागणीनुसार मुली पुरवायचा; पोलिसांनी सापळा रचत हॉटेलवर धाड टाकली अन्..

Tuesday, 27 October 2026, 14:54

पुरंदरमधील दुहेरी हत्याकांडाचा छडा! संशयित ताब्यात, टीप मिळताच पोलिसांचा 50 किमी पाठलाग; सशस्त्र नाकाबंदी करत घेराव घातला अन्…

Tuesday, 27 October 2026, 14:49

विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड चालणार नाही! वयाच्या पुराव्याबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; आता कोणती कागदपत्रे ग्राह्य धरणार?

Tuesday, 27 October 2026, 14:47

पुण्यातील प्रसिद्ध ‘मोरपंख सारीज’ व्यवसायात 1 कोटी 59 लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 14:22

पुणे पोलिस दलातील अंमलदाराला 12 किलो गांजासह अटक! वैद्यकीय रजेवर असताना तेलंगणात रेल्वेतून कथित तस्करी

Tuesday, 27 October 2026, 14:19
Next Post

मुंढेंच्या कारवाईला स्थगिती! राजकीय हस्तक्षेपाचा आरोप; मिथेनॉल कंपन्यांच्या परवान्यांवरून वाद; झिरवाळ यांनी दबाव नाकारला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp