भारतात अनेक सण-उत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात साजरे केले जातात. त्यात लक्ष्मीपूजन हा सण विशेष ठरतो. या सणाला तसे विशेष महत्त्वही आहे. हा दिवस देवी लक्ष्मीच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. पण या दिवशी काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास लक्ष्मी माता नाराज होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी पैशाचे व्यवहार टाळावेत. असे केल्याने तुम्ही देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता. वास्तुशास्त्रानुसार, या दिवशी पैसे देणे किंवा घेणे नशिबात अडथळे आणते आणि आर्थिक संकट येऊ शकते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी आर्थिक व्यवहारांपासून दूर राहणेच योग्य.
दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी झाडू मारणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो. असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर जाऊ शकते. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे दिवाळीच्या दिवशी झाडूला स्पर्श करणे टाळावे. पायांनी स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते, ज्यामुळे पैशाची समस्या वाढू शकते.
तसेच घर स्वच्छ आणि नीटनेटके असले याकडेही विशेष लक्ष द्या. स्वच्छ आणि नीटनेटके घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करा. अस्वच्छ घरात लक्ष्मी वास करत नाही. म्हणूनच, स्वच्छतेची काळजी घेणे आणि आपले घर सजवणे आवश्यक आहे.