पावसाळा म्हटलं तर अनेकांचा फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. पण कुठं जावं हे जर तुमचं अजून ठरलं नसेल तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. डलहौसी हे एक ऑफबीट हिल स्टेशन आहे. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. पॅराग्लायडिंगसारख्या रोमांचक सफरीचा तुम्ही येथे आनंद घेऊ शकता.
उत्तराखंडमधील अल्मोडा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जाणे योग्य असते. या महिन्यांत तुम्हाला इथल्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीचा आनंद घेता येणार नाही. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर बसून पावसाचा आनंद नक्कीच घेता येणार आहे. तसेच मलाना हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. मलाना हे हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध गाव आहे. येथील संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
सुंदर हिमालयीन दृश्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही मलाना या ठिकाणाला भेट देऊ शकता. हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, जिथे जाणे बहुतेक तरुणांना आवडते. काश्मीर देखील पर्याय ठरू शकतो. तलाव आणि बागांच्या मध्ये वसलेल्या काश्मीरला पृथ्वीचा स्वर्ग म्हटले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कश्मिरचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. त्यामुळे या काळात काश्मीरला जाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकते.