पती-पत्नीचे नाते हे प्रेमाचे, विश्वासाचे असते. हे नाते अतूट राहावे असा अनेक जोडप्यांकडून प्रयत्न केला जातो. नाते जितके चांगले असेल तितके ते टिकवणे कठीण असते. जेव्हा दोन लोक वेगवेगळ्या विचारांसह, सवयींसह आणि भावनांसह नातेसंबंधात येतात, तेव्हा भांडणे सामान्य असतात. पण बऱ्याचदा असे घडते की कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वारंवार भांडणे होतात. जर आपल्याही बाबतीत असे होत असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अनेकदा भांडणं शांत करण्याच्या अनेक प्रयत्नांनंतरही भांडणे संपत नाहीत, ज्यामुळे नाते कमकुवत होऊ शकते. जर तुम्हीही तुमच्या नात्यात अशाच टप्प्यातून जात असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. केवळ तुमचे विचार व्यक्त करून कोणतेही नाते मजबूत होऊ शकत नाही. कोणत्याही नात्यात, ऐकणे हे बोलण्याइतकेच महत्त्वाचे असते. अनेकदा भांडणे वाढतात, कारण दोन्ही पार्टनर एकमेकांचा दृष्टिकोन बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि समोरची व्यक्ती काय म्हणत आहे ते नीट ऐकत नाहीत.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक कपल्स एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत, ज्यामुळे वादविवाद होतात. प्रेमात वेळेची कमतरता भासते, तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टी वाईट वाटू लागतात. म्हणून एकमेकांसाठी वेळ काढा. आठवड्यातून किमान एक दिवस काहीतरी खास प्लॅन करा. त्याने तुमच्यामध्ये जवळीक वाढू शकते.