Lifestyle : मसाल्यात हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे काळे मिरे. काही लोक तिखटाला पर्याय म्हणून काळ्या मिऱ्याची पूड वापरतात. जगातील अनेक देशांना काळ्या मिऱ्याचे औषधी गुणधर्म माहिती आहेत. काळे मिरे आणि विलायची यांचे समभाग घेऊन त्यांची भुकटी केली तर ती भुकटी हागवणीवर चांगली गुणकारी ठरते. मिरे आणि जिरे यांचे काही गुणधर्म सारखेच आहेत.
मिऱ्याला मसाल्यांचा बादशाह म्हणतात. मिऱ्यामध्ये पायपॅरीन नावाचा घटक असतो आणि पायपॅरीनमुळे भूक वाढते. असा अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे. पायपॅरीनमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. आफ्रिका खंडातील लोक अंगाच्या घामाला वास येऊ नये म्हणून मिऱ्याचा वापर करतात. म्हणून आता जगभरातील शास्त्रज्ञ मिऱ्याचा वापर डेंगी तापाच्या विरोधात कसा करता येईल, यावर संशोधन करत आहेत.
मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास ती घेणाऱ्याची भूकसुद्धा वाढते. डेंगी तापाला कारणीभूत ठरणाऱ्या डासावर काळ्या मिऱ्याचा मारक परिणाम होतो. या डासांची अंडी मिऱ्यामुळे मरून जातात. त्यामुळे हा देखील गुणधर्म महत्त्वाचा मानला जातो. याशिवाय, काळे मिरे इतर अनेक आजारांवर फायदेशीर मानले जात.