पुणे प्राईम न्यूज डेस्क: मटण हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असले तरी त्यानंतर काही अन्नपदार्थ खाल्ल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, मटणानंतर काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास हृदय, किडनी आणि पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे खालील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

1) मध टाळा: मटण खाल्ल्यानंतर लगेच मधाचे सेवन केल्यास हृदय आणि किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
2) दूधजन्य पदार्थ खाणे टाळा: मटणासोबत दूध, दही, चीज यासारखे दूधजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे अपचनाचा त्रास कमी करता येतो.
3) थंड पाणी किंवा कोल्डड्रिंक नको: मटणानंतर थंड पाणी, बर्फ किंवा कोल्डड्रिंक घेतल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी खोलीच्या तापमानाचे पाणी प्यावे.
4) गरम पेये पिऊ नका: मटणानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेतल्यास गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.
5) मसालेदार पदार्थ टाळा: तिखट आणि जड मसाल्याचे पदार्थ खाणे टाळा. यामुळे पचनक्रियावर गंभीर परिणाम होतात.
6) पनीर आणि आंबट फळं टाळा: हे एकत्र खाल्ल्यास पचनात अडथळा निर्माण होऊन गॅस, पोटदुखी किंवा अपचन होऊ शकते.
(टीप : वरील माहिती वाचकांपर्यंत केवळ मार्गदर्शन म्हणून पोहोचवली आहे. ‘पुणे प्राईम न्यूज ’ यातून कोणताही दावा करीत नाही)








