Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 September 2026, 20:19

बारामती: बारामतीमध्ये झुंबा डान्स क्लास आणि जिमवर कारवाई न करण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार महेश अंकुश उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महेश उगले हे पोलिस हवालदार असून त्यांची नेमणूक बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात होती. या कारवाईमुळे बारामती पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची पत्नी झुंबा डान्स क्लास आणि जिम चालवतात. या क्लासमुळे त्रास होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली होती. त्याआधारे तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरोधात कारवाई करण्यासाठी अर्ज पोलिसांकडे चौकशीसाठी आला होता. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी महेश उगले यांनी तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापैकी दोन लाख रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचेही तपासात समोर आले आहे.

तक्रारदाराने याबाबत 7 सप्टेंबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी पंचांसमक्ष महेश उगले यांनी सात लाख रुपयांच्या लाचेबाबत चर्चा केली. यापूर्वी दोन लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करत उर्वरित पाच लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले.

त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी एसीबीने सापळा रचला. बारामतीतील माळेगाव रोडवरील पीडीसीसी बँकेजवळ तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना महेश उगले यांना दुपारी 3.02 वाजता रंगेहात पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलिस हवालदार प्रवीण तावरे, पोलिस कॉन्स्टेबल आश्विन कुमकर आणि चालक पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांचा समावेश होता. या कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp