Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 September 2026, 22:50

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळालेल्या ‘एमएच 61’ या नवीन वाहन नोंदणी मालिकेला वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुचाकींसाठी सुरू करण्यात आलेली ‘एमएच 61 बी’ मालिका अवघ्या सात दिवसांत जवळपास संपली असून, पुढील एका दिवसात तिचे सर्व क्रमांक संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरटीओकडून आता दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच 61 सी’ ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे.

पुण्याची ओळख असलेल्या ‘एमएच 12’ मालिकेतील क्रमांक उपलब्ध नसल्याने पुणे आरटीओला ‘एमएच 61’ ही नवीन मालिका देण्यात आली. ‘एमएच 12’ हीच मालिका पुढे सुरू ठेवावी, अशी मागणी वाहनधारक आणि विविध स्तरांतून करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही मागणी मान्य होऊ शकली नाही.

‘एमएच 61 सी’ मालिकेतील पसंती क्रमांकांसाठी वाहनधारकांना 8 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत अर्ज करता येणार आहेत. एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याच दिवशी सायंकाळी लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर 9 सप्टेंबरपासून ही मालिका सर्व दुचाकी वाहनधारकांसाठी खुली केली जाणार आहे.

दरम्यान, ‘एमएच 61 बी’ मालिकेतील व्हीआयपी आणि आकर्षक क्रमांकांसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. पसंतीच्या क्रमांकांसाठी आरटीओकडे 1,082 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये ‘9’ या एक अंकी क्रमांकासाठी तब्बल 3 लाख 71 हजार रुपयांची विक्रमी बोली लागली. तसेच 6, 5, 555, 1234 आणि 9909 या क्रमांकांसाठीही वाहनधारकांनी मोठ्या रकमा मोजल्या.

 

चारचाकी वाहनांसाठी ‘एमएच 61 ए’ ही मालिका सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे तीन हजार क्रमांकांची नोंदणी झाली आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ही मालिकाही लवकर संपण्याची शक्यता आहे. आरटीओच्या एका मालिकेत 9,999 क्रमांक असतात. साधारणपणे दुचाकीची मालिका संपण्यासाठी सुमारे 15 दिवस लागतात. मात्र, सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने काही वेळा आठवडाभरातच मालिका संपते. यंदा ‘एमएच 61 बी’ मालिकेलाही मोठा प्रतिसाद मिळाल्याने ती अवघ्या आठ दिवसांत संपण्याच्या मार्गावर आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp