पुणे प्राईम न्यूज डेस्क: सकाळी उठल्यानंतर अनेकजण ताजेतवाने वाटावे म्हणून फळांचा रस (फ्रूट ज्यूस) पिणे पसंत करतात. यामागील उद्देश शरीराला ऊर्जा देणे आणि आरोग्यास चालना देणे असतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या वेळेस फळांचा रस पिण्याचे फायदे कमी आणि तोटे अधिक आहेत.

का असतो धोका?
1. फायबरचा अभाव
रस काढताना फळातील फायबर (तंतू) दूर होतात. हे फायबर पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त असते. त्याशिवाय फायबरमुळे साखर हळूहळू रक्तात मिसळते, जे थेट रस पिल्यास होत नाही.

2. साखरेचं अधिक प्रमाण

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. पण रस पिताना आपण अधिक फळांचा उपयोग करतो, ज्यामुळे एकाचवेळी खूप साखर शरीरात जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
3. इन्सुलिन स्पाईक
जर कोणाला डायबिटीजचा धोका असेल, तर सकाळी रस पिल्यास इन्सुलिन स्पाईक होण्याचा धोका वाढतो. यामुळे इन्सुलिन प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते.
4. उर्जा कमी होण्याची शक्यता
रसामुळे काही वेळ ऊर्जावान वाटते, पण काही तासातच अचानक ऊर्जा कमी होते, कारण साखर झपाट्याने कमी होते.
डायटीशियन व पोषणतज्ज्ञ सांगतात की, फळांचा रस पिण्यापेक्षा थेट संपूर्ण फळ खाणे जास्त फायदेशीर आहे. संपूर्ण फळामुळे तृप्ती जास्त मिळते आणि पचनक्रिया सुधारते. सकाळच्या वेळेस फळांचा रस पिण्याचा विचार करत असाल, तर दोनदा विचार करा. त्याऐवजी संपूर्ण फळ खा.
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात आली आहे. ‘पुणे प्राईम न्यूज’ यातून कोणताही दावा करीत नाही.)







