Yavatmal Crime News : यवतमाळ : आजच्या सोशल मिडीयाच्या जगात मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे जग माणसाच्या जवळ आले आहे, असे मानले जाते. मात्र असे असले तरी मोबाईलच्या अधिक आहारी जाऊन लागणारे व्यसन हे फार भयावह असू शकते. मोबाईलच्या अतिवापरातून होणाऱ्या अपघातांची अनेक उदाहरण आपण बघतो अथवा वाचत असतो. अशीच एक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाने केवळ मोबईल रीचार्ज करायला पैसे न दिल्याच्या वादातून रागाच्या भरात चक्क आपल्या आजीचा गळा आवळून हत्या केली.
असे होते प्रकरण
या प्रकरणातील आरोपी असलेल्या 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते याचे गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा रीचार्ज संपला होता. रीचार्जसाठी आपल्याकडे पैसे नाही म्हणून त्याने आपल्या आजीकडे पैश्यांची मागणी केली. मात्र आजीने त्यास नकार दिला आणि त्याने पैसे देण्यासाठी परत आजीकडे तगादा लावला. त्यानंतर आजीचे आणि महेशचा वाद झाला आणि या वादातून राग अनावर झाल्याने महेशने हे टोकाचे पाऊल घेत आजीची गळा आवळला. अल्पावधीतच आजीचा जागीच मृत्यू झाला.
ही खळबळजनक घटना यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली. सिंधुबाई भरत पोवते असे मृत आजीचे नाव आहे. त्या 76 वर्षाच्य होत्या. तर 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते आसे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सिंधुबाई यांच्या मुलीच्या लक्ष्यात आल्यावर तीने पोलीस स्टेशन गाठून नातू महेश पावते विरोधात तक्रार दिली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या तक्रारीवरून यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी महेश विश्वास पोवतेला अटक केली. या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मात्र शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून करून आरोपीला अटक केली. For