WhatsApp chat blur : नवी दिल्ली : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हॉट्सऍप सगळ्याच वयोगटातील लोक वापरतात. त्यात अनेक लोक कामासंदर्भात बोलत असतात तर अनेक लोक काही खासगी चर्चादेखील करत असतात.
काही गोष्टी खूपच वैयक्तिक असतात. त्यामुळे या चॅट कोणीही वाचू नये, असे आपल्याला वाटत असते. त्यामुळे या चॅट लपवण्यासाठी आपण आयराईव्हमध्ये ठेवत असतो. सर्च केले तरीही या चॅट सगळ्यांना दिसत असते. मात्र, जर तुम्हाला खासगी चॅट लपवायच्या असतील तर तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहोत. ही ट्रिक वापरुन तुम्ही खासगी चॅट ब्लर करू शकता.
व्हॉट्सअॅपवरील चॅट लपवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक्सटेंशन गरज लागणार आहे. व्हॉट्सअॅपसाठी प्रायव्हसी एक्सटेंशन ब्लर मेसेजेस असे त्याचे नाव आहे.
असे करा मेसेजेस ब्लर…
– व्हॉट्सअॅपसाठी प्रायव्हसी एक्सटेन्शन ब्लर मेसेजेसवर क्लिक केल्यावर क्रोम वेब स्टोअर ओपन होईल.
– उजवीकडे अॅड टू क्रोमचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर वर अँड एक्सटेंशनचा पॉप-अप दिसेल. त्यावर क्लिक करा.
– ते डाऊनलोड होताच यूआरएलच्या बाजूला एक्सटेन्शनचा लोगो दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही टॉगल चालू करा.
– आता व्हॉट्सअॅप वेबवर गेल्यावर तुम्हाला सर्व चॅट ब्लर दिसतील. जेव्हा आपण वैयक्तिक चॅटवर क्लिक कराल तेव्हा ते फक्त आपल्याला दिसेल.