पुणे : राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला असतानाच पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठ जलसंकट आलं आहे. या जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. एप्रिलच्या मध्यावरच उजनी धरण मायनसमध्ये गेल आहे.त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
सध्या उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा उणे -0.03 टीएमसी तर मृत पाणीसाठा 63.62 टीएमसी एवढा आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी तसेच मुख्य कालवा आणि इतर पाणी योजनांद्वारे 6 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.उजनी धरणामुळे सर्वाधिक क्षेत्र ओलीताखाली आहे. परंतु, यंदा पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने मोठे जलसंकट उभ राहील आहे.
उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजना, पाणी योजना आणि उद्योगांचा पाणीपुरवठा यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. तरीही दरवर्षी धरणातील मृतसाठ्यातील निम्मा पाणीसाठा संपेपर्यंत पाणी वापरले जाते. त्यामुळे तुर्तास मोठं जलसंकट जाणवणार नाही.