पुणे, : वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवर असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 1 लाख 1 हजार 800 रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक अॅक्टिव्हा दुचाकी व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ओंकार ऊर्फ बद्या प्रकाश बधे (वय-26), रा. डॉ. राम मनोहर लोहियानगर वसाहत, हडपसर अये अटक करण्यात आलेल्या आरोपीचीं नाव आहेत . गुरुवारी (ता. 24) वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने हि कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी वानवडी पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालीत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार यतीन भोसले व गोपाळ मदने यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार ओंकार बधे हा मोठ्या कॅनालच्या लगत काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगुन वावरत असुन संशयित चिजवस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली होती.
सदरची माहिती वरिष्ठांना कळवून सदर ठिकाणी छापा टाकला असता एक इसम संशयितरित्या त्याचेकडील दुचाकीवर बसलेला दिसला. लीसांची चाहुल लागताच तो त्याचेकडी दुचाकी चालु करुन पळु लागला. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव ओंकार ऊर्फ बद्या प्रकाश बधे सांगितले.
दरम्यान, त्याच्या अंगाची झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, एक दुचाकी व रोख रक्कम मिळून आली. प्राथमिक चौकशीत, त्याने हे शस्त्र स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या तसेच दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 (25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) सह 135 अन्वये गुन्हा (गु.र.नं. 176/2025 दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीवर यापूर्वी देखील मारामारी, दंगल व आर्म अॅक्टसारखे गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक धनाजी टोणे हे स्वतः करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहआयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे व त्यांच्या पथकाने केली. विशेष पथकात पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे आणि सोमनाथ कांबळे या विशेष पथकाने केली आहे.