Vaduj News : वडूज: शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा. त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून शेती उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. खटाव तालुक्यातील वडूज येथील शेती उत्पन्न बाजार समितीकडे व्यापारी गाळे व पुसेसावळी पुसेगाव, वडूज अशा मोक्याच्या ठिकाणी सुमारे १५ एकर क्षेत्र आहे. सध्या वडूज येते बांधा वापरा आणि हस्तांतरित करा वापरा अशा पद्धतीने पहिला प्रायोगिक तत्त्वावर व्यापारी गाळे बांधण्यात येणार आहे. (Vaduj Agriculture Produce Market Committee will construct Gale on pilot basis..)
वर्षभरात गाळे उपलब्ध केले जाणार
व्यापारी गाळे हे शेतकरी व सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना सुमारे एका वर्षात हे नवीन गाळे उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० जानेवारी १९७७ साली तात्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, आमदार केशवराव पाटील, सभापती संभाजीराव घाटगे व मोहनराव गुदगे अशा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाघाटन करण्यात आले. (Vaduj News) या ठिकाणी व्यापारी गाळे बांधण्यात आले. त्याचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाघाटन करण्यात आले. परंतु, सदरचे व्यापारी गाळे बांधत असताना स्लॅब टाकण्यात आला होता. पण या स्लॅबवर जाण्यासाठी जिना बांधला नाही. तो जिना का बांधला नाही? हा संशोधनाचा विषय असला तरी त्याची पुनरावृत्ती नवीन बांधकाम होणाऱ्या गाळ्यात होऊ नये. यासाठी शेती उत्पन्न बाजार समितीचे नूतन पदाधिकारी व शेतकरी संघटना तसेच जाणकार व्यक्तींनीहीकाळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेती उत्पन्न बाजार समितीची जागा ही वडूज नगरीमध्ये असली तरी खटाव तालुक्यातील डिस्कळ, बुध, पुसेगाव, खटाव, सिद्धेश्वर कुरोली, पुसेसावळी, निमसोड, मायणी, तडवळे, एनकूळ कलेढोण, गुरसाळे, नडवळ अशा महत्त्वाच्या गावातील शेतकऱ्यांचे (Vaduj News) या बाजार समितीच्या उभारणी साठी खूप मोठे योगदान आहे. त्या शेतकऱ्यांना ही या नवीन गाळ्या मध्ये शेतीमाल विक्री व व्यापारी पद्धतीने व्यापार करण्यासाठी संधी मिळावी. अशी मापक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती उत्पन्न बाजार समिती असते. पण, अलीकडच्या काळामध्ये त्याचा व्यापारीकरण झपाट्याने होऊ लागलेले आहे. पहिल्या टप्प्यात बारा + वीस चे दहा गाळे व दुसऱ्या टप्प्यात दहा + वीस चे दहा गाळे असे तीस वर्षाच्या भाडे करारावर (Vaduj News) अनामत रक्कम व भाडेतत्त्वावर हे गाळे वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात या निविदा मागून त्या सर्वांच्या समक्ष उघडून ज्या ठेकेदारांनी ही निविदा भरली आहे.
त्यापैकी एकाला ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वानुसार हे बांधकामाचा ठेका मिळणार आहे. वडूज नगरीचा झपाट्याने विकास होत असून व्यापारी व निवासी बांधकामासाठी जागेचे दर गगनाला भेटलेले आहेत. अशा वेळेला वडूज- पुसेगाव रस्त्यावरील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जागेला अत्यंत महत्त्व आलेले आहे. त्यामुळे येथील गाळा घेण्यासाठी (Vaduj News) मोठी चुरस निर्माण होणार आहे. हे त्रिवार सत्य आहे.
सदरचे गाळे हे व्यापारी तत्त्वावर व्यापाऱ्यांना मिळावे. हे जरी तत्त्व असले तरी शेतीमालासाठी शेतकऱ्यांनाच हे गाळे देताना सर्वांचा समावेश व्हावा .अन्यथा ठराविक लोकांसाठी बांधा, मर्जीतील लोकांना हस्तांतरित करा, आणि कोणत्याही कारणासाठी ते गाळे वापरा असे प्रचलित धोरणानुसार जे सर्वत्र होत आहे. तसे होऊ नये. अशी मापक अपेक्षा शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण व इतर शेतकरी सभासद बांधवांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : वडूज पोलिसांच्या तत्परतेने तीन अल्पवयीन मुली पुन्हा स्वगृही परतल्या