Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 3 May 2026, 16:51

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : चारचाकी गाडी चालवताना चालकाला अचानक डुलकी लागल्याने ताबा सुटून गाडी थेट पुलावरून खाली असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली. रविवारी (ता. 03) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी-उरुळी कांचन राज्य मार्गावर शिंदवणे जवळील राजेवाडी परिसरात हि घटना घडली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. Uruli Kanchan News

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 03) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथील कुटुंबीय एका इनोव्हा कारमधून जेजुरी-उरुळी कांचन मार्गावरून जात होते. राजेवाडी परिसरातील पुलावर गाडी आली असता, चालकाला अचानक डुलकी लागली. वेगात असलेली गाडी थेट पुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या खड्ड्यात कोसळली. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघातग्रस्त चारचाकीतील व्यक्तींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. Uruli Kanchan News

गाडी खड्ड्यात अडकल्याने तिला बाहेर काढणे कठीण होते. अशा वेळी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कुणाल काळभोर, शुभम काळभोर, अजिंक्य काळभोर, अर्जुन जंगले, श्रेयस वीरकर आणि संग्राम काळभोर व काही तरुण मदतीसाठी धावून आले. या तरुणांनी तातडीने हालचाल करून ट्रॅक्टरची व्यवस्था केली. Uruli Kanchan News

दरम्यान, या तरुणांनी जीवाची पर्वा न करता धाडसी कारवाई करत ट्रॅक्टरच्या साहाय्याने सदर चारचाकी गाडी खड्ड्यातून बाहेर काढली. मदतीसाठी पुढे आलेल्या लोणी काळभोरच्या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Uruli Kanchan News

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp