Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: पेठ येथील झेडपी शाळेच्या मुलांचा मुख्यमंत्र्यांशी ‘फ्रेंच’ मध्ये संवाद; शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 12 April 2026, 10:58

उरुळी कांचन, (पुणे) : जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं की, (Uruli Kanchan News )डोळ्यासमोर फक्त स्थानिक भाषा येते, पण हवेली तालुक्यातील पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने हा समज मोडीत काढला आहे. या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अस्खलित फ्रेंच भाषेत संवाद साधला. ग्रामीण भागातील मुलांचा हा आत्मविश्वास आणि परकीय भाषेवरील प्रभुत्व पाहून मुख्यमंत्र्यांनीही आश्चर्य व्यक्त करत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

 

या यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत ते म्हणजे शाळेचे मार्गदर्शक शिक्षक सचिन साकोळकर सर. परकीय भाषा शिकणे अवघड मानले जात असताना, साकोळकर सरांनी आपल्या कल्पक अध्यापन पद्धतीतून ग्रामीण भागातील मुलांमध्ये फ्रेंच भाषेची गोडी निर्माण केली. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच आज ही मुले जागतिक स्तरावरील भाषेमध्ये संवाद साधण्यास सक्षम झाली आहेत.

शिक्षकांच्या अशा धाडसी प्रयोगांमागे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भक्कम सहकार्य लाभले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच पेठ शाळेतील शैक्षणिक दर्जा आज ‘ग्लोबल’ झाला आहे.

दरम्यान, मराठी मातीत वाढलेली मुले जेव्हा परकीय भाषेत मुख्यमंत्र्यांशी सहजपणे बोलू लागली, तेव्हा उपस्थित सर्वच भारावून गेले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेली शाबासकीची थाप ही केवळ पेठ शाळेसाठी नाही, तर संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेसाठी गौरवास्पद ठरली आहे. सध्या सोशल मीडियासह सर्वत्र सचिन साकोळकर सर आणि त्यांच्या या हुशार विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59
Next Post

Uruli Kanchan: शिंदवणे घाटात कंटेनरमधून पोकलेन मशीन कोसळले रस्त्यावर; जीवितहानी नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.