Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 20 April 2026, 16:01
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

यवत, (पुणे) : किराणा दुकानात आईस्क्रीम उधार न दिल्याच्या कारणावरून दुकानदारावर आणि त्यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत आरोपींनी चक्क दुकानदाराच्या गालाचा आणि मुलाच्या हाताचा चावा घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हि घटना शनिवारी (ता. 18) रात्री सात वाजण्याच्या सुमारास वरवंड (ता. दौंड) हद्दीतील गोपीनाथ नगर येथे घडली

याप्रकरणी बाळासाहेब विनायक शितोळे, (वय 64, व्यवसाय – किराणा दुकान, रा. गोपीनाथ नगर वरवंड ता. दौड जि.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम गणेश खेडकर व गणेश रघूनाथ विटेकर (दोन्ही रा. वरखंड ता. दौंड) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब शितोळे यांचे गोपीनाथ नगर येथे किराणा दुकान आहे. शनिवारी (ता. 18) रात्री सात वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब हे आपल्या दुकानात बसलेले असताना, शेजारी राहणारे आरोपी शुभम खेडकर आणि गणेश विटेकर तिथे आले. त्यांनी बाळासाहेब यांच्याकडे आईस्क्रीमची मागणी केली आणि ते उधार देण्यास सांगितले.

 

बाळासाहेब यांनी आईस्क्रीम उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपी शुभम खेडकर याने अश्लील शिवीगाळ करत आपल्या हातातील कड्याने बाळासाहेब यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली जोरात प्रहार केला. इतक्यावरच न थांबता, दुसरा आरोपी गणेश विटेकर याने बाळासाहेब यांच्या उजव्या गालाचा जोरात चावा घेतला.

वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचा मुलगा भालचंद्र हा तिथे भांडण सोडवण्यासाठी धावून आला. यावेळी आरोपी गणेश याने भालचंद्र याच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि डाव्या कानावरही जोरात चावा घेऊन त्याला जखमी केले. जाता जाता आरोपींनी “तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन दुकानाचा बोर्ड तोडून नुकसान केले आणि तिथून पळ काढला.

दरम्यान, या प्रकरणी बाळासाहेब शितोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Uruli Kanchan News

'शिवीगाळ का केली' विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.