Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 April 2026, 14:29

पुणे, ता. 20 : धाडस, जिद्द आणि अदम्य शौर्याची पराकाष्ठा करत जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण मानले जाणारे Dhaulagiri mountain : धौलागिरी पर्वत (8,167मीटर) हे शिखर शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी यशस्वीरीत्या सर करून महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद इतिहास रचला आहे. नागपूर शहर पोलीस गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ननवरे यांनी आपल्या धाडसी मोहिमेद्वारे केवळ शिखर सर केले नाही, तर ‘अशक्य’ वाटणाऱ्या मर्यादांनाही छेद दिला आहे. Dhaulagiri mountain

ही कामगिरी विशेष ठरण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातून धौलागिरी शिखर सर करणारे ते पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या या यशाने संपूर्ण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, राज्यभरातून त्यांच्या पराक्रमाचे कौतुक होत आहे. Dhaulagiri mountain

धौलागिरी शिखर हे गिर्यारोहकांसाठी अत्यंत कठीण आणि धोकादायक समजले जाते. तीव्र थंडी, प्राणवायूची कमतरता, अचानक येणारी बर्फाची वादळे, खडतर चढ-उतार आणि खोल हिमफटी (क्रेव्हासेस) यांचा सामना करत शिखर गाठणे म्हणजे मृत्यूशी दोन हात करण्यासारखे असते. अशा परिस्थितीतही ननवरे यांनी शिस्तबद्ध नियोजन, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक बळ यांच्या जोरावर ही मोहीम यशस्वी केली.

दरम्यान, धौलागिरीपूर्वीही ननवरे यांनी जगातील अनेक कठीण आणि उंच शिखरांवर यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये माउंट एव्हरेस्ट (8,848.86 मीटर), माउंट लोहत्से (8,516 मीटर), माउंट मकालू (8,485 मीटर) आणि माउंट मनास्लू (8,163 मीटर) या शिखरांचा समावेश आहे. या सलग यशामुळे त्यांचे नाव देशातील अग्रगण्य गिर्यारोहकांमध्ये घेतले जाते. Dhaulagiri mountain

 

पोलीस दलातील जबाबदाऱ्या पार पाडताना गिर्यारोहणासारख्या अत्यंत कठीण क्षेत्रात एवढी मोठी कामगिरी करणे ही दुर्मीळ बाब आहे. दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी आपल्या आवडीला आणि ध्येयाला न्याय दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलातील जवानांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. Dhaulagiri mountain

‘जिद्द असेल तर शिखर दूर नाही’
शिवाजी ननवरे यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. “जिद्द, मेहनत आणि धैर्य असेल तर कोणतेही शिखर गाठता येते,” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे महाराष्ट्राचा तिरंगा हिमालयाच्या उंच शिखरावर अभिमानाने फडकला असून, भविष्यात आणखी मोठ्या मोहिमांसाठी ते सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. Dhaulagiri mountain

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30

‘लाडक्या बहिणीं’ची एसटी सवलत धोक्यात! NCMC कार्ड नसल्यास 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही सवलत

Monday, 28 September 2026, 14:06

दुष्काळाची झळ आता शेअर बाजारालाही? महाराष्ट्रातील परिस्थितीने वाढवली चिंता

Monday, 28 September 2026, 13:55

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32
Next Post
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp