Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 13:26

पुणे: पुणे शहर आणि परिसरात अवघ्या 3 दिवसांच्या कालावधीत चार विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून या सर्व प्रकरणांमध्ये कौटुंबिक छळ, पैशांची मागणी आणि हुंड्यासाठी होणारा मानसिक व शारीरिक त्रास हे समान धागे असल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनांमुळे पुण्यात खळबळ उडाली असून संबंधित पोलिस ठाण्यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

पहिली घटना चंदननगर परिसरातील तुकारामनगर येथे 3 जून रोजी घडली. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय 25) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तक्रारीनुसार, कार आणि घर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव त्यांच्यावर टाकला जात होता. या प्रकरणी पती गोरख सोनवणे याला अटक करण्यात आली असून सासू-सासऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसरी घटना वाघोली येथे घडली. प्रियांका गणेश कांबळे (वय 25) यांनी 1 जून रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पैशांच्या मागणीसह होत असलेल्या कथित छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती गणेश कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

कोंढवा खुर्दमधील साईबाबानगर येथे 31 मे रोजी तिसरी घटना घडली. मिसबा एजाज कुरेशी ताडे (वय 21) यांनी आत्महत्या केली. लग्नावेळी अपेक्षित हुंडा न मिळाल्याच्या कारणावरून छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथी घटना आंबेगाव परिसरात घडली. 20 वर्षीय विवाहितेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले. प्रेमविवाहानंतरही हुंड्याच्या मागणीसाठी छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या 72 तासांत घडलेल्या या चार घटनांमुळे कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून सर्व प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Next Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.