Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घर बांधण्यावरुन झालेल्या दोन भावंडांच्या गटात मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; दौंड तालुक्यातील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 31 May 2025, 11:16

दौंड (पुणे) : नानवीज (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत घर बांधण्यावरून झालेल्या दोन भावंडाच्या गटात लोखंडी गजाने, विटेने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 29) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नानवीज (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी 9 जणांविरुद्ध विविध कलमान्वये परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

याप्रकरणी विकास मारूती पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रकाश मारूती पाटोळे, अतुल प्रकाश पाटोळे, प्रफुल प्रकाश पाटोळे, माया उर्फ प्रतीभा प्रकाश पाटोळे, प्रतीक्षा प्रकाश पाटोळे (सर्व रा. नानवीज ता. दौंड) तर प्रतिभा प्रकाश पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विकास मारुती पाटोळे, विराज विकास पाटोळे (रा. दोघेही नानवीज ता. दौंड), निता खंडेराव शितोळे, व चेतन खंडेराव शितोळे (रा. पडवी ता. दौंड) असे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत विकास पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विकास पाटोळे व प्रकाश पाटोळे हे सख्खे भाऊ आहेत. गुरुवारी प्रकाश पाटोळे हे कोणाला काही न सांगता घराचे बांधकाम करीत होते. त्यामुळे विकास यांनी आपले वाटण्या झाल्या शिवाय तु काय बांधकाम करू नको ” असे सांगितले. यावेळी प्रकाश पाटोळे, अतुल पाटोळे, प्रफुल पाटोळे, प्रतीभा पाटोळे, प्रतीक्षा पाटोळे आले व त्यांनी शिवागाळ दमदाटी करून हाताने व लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली.

यावेळी बहीण निता शितोळे व मुलगा विराज पाटोळे हे सोडवण्यास आले असता त्यांनाही हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली.याप्रकरणी विकास पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील पाच जणांवर दौंड पोलीस ठाण्यात भा.न्या संहिता कलम 189(2), 191(2), 118(1),115(2), 351(2), 352, अपंग कायदा कलम 92 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसऱ्या घटनेत प्रतिभा पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रतिभा पाटोळे व त्यांचे कुटुंबीय घराचे बांधकाम करीत असताना निता शितोळे, विकास पाटोळे, विराज पाटोळे, चेतन शितोळे हे त्या ठिकाणी आले व तुम्ही इथे बांधकाम करायचे नाही ही जागा आमची आहे असे म्हणुन ननंद निता शितोळे यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. चेतन खंडेराव शितोळे याने आम्हाला शिवीगाळ करुन घराचे बांधकाम पाडुन नुकसान केले.

यावेळी मुले अतुल व प्रफुल्ल हे दोघेजण भांडणे सोडविण्यासाठी आले असता विकास व विराज पाटोळे यांनी लोखंडी गजाने अतुल व प्रफुल यांना हातावर, छातीवर, पाठीवर व प्रफुल्ल याचे हातावर, कमरेवर, पाठीवर मारहाण करुन दुखापत केली. तसेच पती प्रकाश पाटोळे यांना हाताने मारहाण करुन इथे बांधकाम करायचे नाही तुम्ही इथे बांधकाम केले तर तुम्हाला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली आहे. प्रतिभा पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भा.न्याय.संहिता कलम 118(1), 115(2),352, 351(2),324(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार दौंड पोलिसांनी 9 जणांविरुद्ध विविध कलमान्वये परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तपास दौंड पोलीस करीत आहेत.
11:10 am

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

पुण्यात फिटजी घोटाळा ; 31 विद्यार्थ्यांची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक, संचालकांसह चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp