Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 30 August 2026, 20:13

बारामती : बारामती तालुक्यातील पारधी समाजातून संघर्ष करत पोलीस दलात स्थान मिळवून अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या ३१ वर्षीय पोलीस महिलेने कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात घडली. संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

संगीताचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे, तर सासर सुपे येथे आहे. विवाहानंतर त्या पती किरण भानुदास भोसले यांच्यासोबत डोंबिवली पश्चिम भागात राहत होत्या. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पतीला संगीताचा सावळा रंग आवडत नसल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून तिच्याशी वाद घालून मारहाण केली जात असल्याचा आरोप आहे. घरातील वस्तूंच्या खरेदीवरून जास्त पैसे खर्च केल्याच्या कारणानेही दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संगीताने बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या मृत्यूस पतीने प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. करंजे येथील सुलोचना राजेंद्र काळे यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, संगीताच्या सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागणीसह सातत्याने छळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या प्रकरणात इतर सासरच्या मंडळींवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाइकांनी तिचे पार्थिव वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणले होते.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते आणि फौजदार राहुल साबळे यांनी नातेवाइकांची समजूत काढली. डोंबिवली पोलिसांकडून पुरवणी जबाब घेऊन इतर व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर संगीतावर सोमेश्वर मंदिराजवळील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगीताने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत पोलीस दलात प्रवेश मिळवला होता. तिच्या यशामुळे पारधी समाजातील अनेक मुला-मुलींमध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीबाबत आत्मविश्वास निर्माण झाला. परिसरातील अनेक मुलींनी तिला आदर्श मानत पोलीस दलात प्रवेश केला. पती किरण भोसले यालाही पोलीस भरतीसाठी संगीताने मार्गदर्शन केले होते. संघर्षातून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या संगीताचा कौटुंबिक छळाच्या आरोपांनंतर झालेला मृत्यू करंजे आणि सुपे परिसरासाठी अत्यंत वेदनादायी ठरला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12

आलेगाव पाझर तलाव परिसरात ‘मुरूम माफियांचा’ रात्रीचा धुमाकूळ! पोकलेन-जेसीबीने शासकीय जमिनीची चाळण; महसूल विभाग झोपेत?

Thursday, 24 September 2026, 19:03
Next Post

'आमच्या भाईशी वाद का घालतो?' मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp