Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 30 August 2026, 22:55

पंजाब: पंजाबमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरच्या मृत्यूने खळबळ उडाली असून, तिच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या जुन्या मुलाखतीमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. ३ जुलै रोजी मोरिंडा येथे मनजीत गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळली होती. तिला झाडाला बांधून मारहाण केल्यानंतर पेटवून दिल्याचा आरोप आहे. तब्बल ५४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

मनजीतच्या मृत्यूनंतर तिची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने एका व्यक्तीबद्दल बोलताना आपल्याला त्या नात्यातून मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगितले होते. मात्र, तिने संबंधित व्यक्तीचे नाव स्पष्ट केले नव्हते.

मनजीतने मुलाखतीत सांगितले होते की, त्या व्यक्तीला तिच्याकडून शरीर आणि पैसे या दोन्ही गोष्टी हव्या होत्या. तिने त्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, मात्र तरीही नात्यात तिला अपेक्षित असलेली शांतता मिळाली नाही. आपल्यातील वाद संपवण्यासाठी समोरच्या व्यक्तीने सर्व गोष्टी स्पष्ट कराव्यात, अशी तिची अपेक्षा होती. या परिस्थितीमुळे ती अनेकदा एकटी बसून रडत असल्याचेही तिने सांगितले होते.

विशेष म्हणजे, मनजीतने या मुलाखतीत आपल्याला आता पैसा, पार्ट्या किंवा दिखाऊ आयुष्य नको असल्याचे म्हटले होते. त्याऐवजी शांत आणि स्थिर आयुष्य जगण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती. तिच्या मृत्यूनंतर हीच मुलाखत पुन्हा चर्चेत आल्याने तिने नेमक्या कोणत्या व्यक्तीबद्दल हे वक्तव्य केले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

मात्र, मुलाखतीतील व्यक्ती आणि मनजीतच्या हत्येप्रकरणातील आरोपी यांचा संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मुलाखतीबाबतही अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातूनच या दोन्ही घटनांमधील संबंध स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चंदीगड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सेक्टर-३४ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुरावे तपासले जात आहेत. मनजीतचे अपहरण नेमके कुठून झाले, त्या वेळी तिच्यासोबत कोण होते आणि मोरिंडा येथे तिला झाडाला बांधून जाळण्यामागे नेमके कारण काय होते, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे बाकी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रुपाली चाकणकरांच्या विधानाने ठिणगी! रुपाली ठोंबरेंचा संताप, ‘लिपस्टिक लावली म्हणजे…’

Wednesday, 23 September 2026, 15:17

लक्ष्मी रस्ता मिरवणुकीत मोठा बदल; १६ मंडळांना आता फक्त ‘याच’ चौकातून मिळणार प्रवेश

Wednesday, 23 September 2026, 15:12

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरखाली दुचाकी चिरडली, आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू

Wednesday, 23 September 2026, 14:19

DJ, फटाके अन् मोठा आवाज बंद! मुंबई हायकोर्टाचा उत्सवांबाबत मोठा इशारा; नियम तोडल्यास होणार थेट कारवाई

Wednesday, 23 September 2026, 13:55

लोणी काळभोरच्या भाजी मंडईत महिलांचा राडा! शिवीगाळ, धक्काबुक्की अन् मारहाण; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 13:46

चावी हरवली अन् आयुष्यच संपलं! पतीने केली पत्नीची हत्या; 19 वर्षीय जरीनसोबत घडलं भयंकर

Wednesday, 23 September 2026, 13:45
Next Post

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp